गे माय भू
गे माय भू तुझे मी फ़ेडीन पांग सारे ।
आणिन आरतीला हे सुर्य, चंद्र, तारे ॥ धृ. ॥
आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा ।
शब्दात सोड माझ्या आता हळुच पान्हा ॥ १ ॥
आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला ।
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला ॥ २ ॥
मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी ।
माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी ॥ ३ ॥
आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी ।
माझी तुझ्या दुधाने गेली भिजुन वाणी ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment