
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें वांछिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकी ।
भजि जो आदिपुरूखी । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविजयें । होआवें जी ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
- ज्ञानेश्वर माऊली
No comments:
Post a Comment