Thursday, April 29, 2010

जयोस्तु ते जयोस्तु ते


जयोस्तु ते जयोस्तु ते

जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमह्न्मंगले । शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ धृ. ॥
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति सपंदांची ।
स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची ।
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी ।
स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी ॥ १ ॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ।
स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली ।
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची ।
स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ॥ २ ॥
मोक्ष, मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रम्ह वदती ।
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें ।
स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होते ॥ ३ ॥
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते ।
तुजसाठिं मरण तें जनन ।
तुजविण जनन तें मरण ।
तुज सकल चराचर शरण ।
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ ४ ॥
हे हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला ।
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला ।
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला ।
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वा त्यजिला ॥ ५ ॥
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला ।
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला ।
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां ।
कां तुवां ढकलुनी दिधली ।
पूर्वीची ममता सरली ।
परक्यांची दासी झाली ।
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ ६ ॥
- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

ने मजसी ने परत मातृभूमीला


ने मजसी ने परत मातृभूमीला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू
तइं जननी-ह्र्द विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरि तया परत आणिन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं । ही फ़सगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्देचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फ़ुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते जी सरिता । रे
तव्दिरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
नभि या फ़ेन-मिषें हससि निर्दया । कैसा का वचन भंगिसि ऎसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फ़सवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

Tuesday, April 27, 2010

गे माय भू

गे माय भू



गे माय भू तुझे मी फ़ेडीन पांग सारे ।
आणिन आरतीला हे सुर्य, चंद्र, तारे ॥ धृ. ॥

आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा ।
शब्दात सोड माझ्या आता हळुच पान्हा ॥ १ ॥

आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला ।
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला ॥ २ ॥

मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी ।
माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी ॥ ३ ॥

आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी ।
माझी तुझ्या दुधाने गेली भिजुन वाणी ॥ ४ ॥

पसायदान


पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें वांछिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ ४ ॥

चला कल्पतरुंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकी ।
भजि जो आदिपुरूखी । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविजयें । होआवें जी ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

- ज्ञानेश्वर माऊली

Monday, April 26, 2010

प्रार्थना


प्रार्थना


है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो,
अति उच्चत्म जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।
ना हम रहें अपने लिए, हमको सभी से गर्ज है,
गुरुदेव यह आशिष दें, जो सोचने का फ़र्ज है ॥

हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के,
सच प्रेम के नित नेम के, सध्दर्म के सत्कर्म के ।
हो चींड झुठी राह की, अन्याय की अभिमान की,
सेवा करन दास की, परवाह नहीं हो जान की ॥

छोटे न हों हम बुध्दि से, हो विश्वमय से ईशमय,
हो राममय और कृष्णमय, जगदेवमय जगदीशमय ।
हर इंद्रियों पर ताबा कर, हम वीर हों अतिधीर हों,
उज्वल रहे सर से सदा, निजधर्मरत खंबीर हो ॥

अतिशुध्द हो आचार से, तन-मन हमारा सर्वदा,
अध्यात्म की शक्ति हमें, पल भी नहीं कर दे जुदा ।
इस अमर आत्मा का हमें, हर श्वासभर में गम रहे,
अगर मौत भी आ गयी, सुख-दु:ख हमसे सम रहे ॥